Posts

  मुंबईः  'सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरेबाजार सारखे शिस्तबद्धरीतीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही कोविडशून्य गाव करता येऊ शकेलं आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मुंबईः 'सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरेबाजार सारखे शिस्तबद्धरीतीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही कोविडशून्य गाव करता येऊ शकेलं आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. (cm uddhav thackeray live) cm uddhav thackeray मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेसोबत फेसबुक लाइव्हवरुन संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी करोनाची तिसरी लाट, लॉकडाऊन याबाबत भाष्य करतानाच करोनामुक्त गाव या योजनेबाबतही माहिती दिली आहे. शहरातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक...
Image
  तिसऱ्या लाटेचे निमंत्रक होऊ नका; मुख्यमंत्र्यांची जनतेला कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे जनतेसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत राज्य सरकार काय उपाययोजना करणार याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. (cm uddhav thackeray)   मुंबईः  तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही. ते आपल्या वागणुकीवर आणि नियमांच्या पालनावर अवलंबून आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आताचा करोना व्हायरस संसर्ग अधिक वेगाने करतो, झपाट्याने पासरतो आणि रुग्ण बरे होण्यास वेळ लागतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत नागरिकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे जनतेसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने आज एक योजना जाहीर केल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की राज्य ही अशा बालकांसाठी योजना तयार करत असून त्यांचे पुर्ण पालकत्व राज्यसरकार स्वीकारणार आहे. आयुष्याची वाटचाल करतांना ही बालके पोरकी होणार नाही, त्यांच्या प्रत्येक...

राज्यातील लॉकडाऊनचे नवे नियम जाहीर : वाचा काय सुरू काय बंद

  राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला. मात्र काही जिल्ह्यांत रुग्णवाढ अद्यापही असल्याने राज्य सरकारने 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. आत्यावश्यक सेवेतील दुकानं आता सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली रहाणार. राज्यातील जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आलीय 29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल. पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील 2011 च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-...